selective focus photography of brown grass at daytime

We Empowering brands through innovative design and digital marketing strategies.
- Maharashtra's Udyojak Digital Diary

Discover Your Business Story Digitally!

अनिकेत प्रकाश गायकवाड यांना आदर्श उद्योजक पुरस्काराने सन्मानित

नवराष्ट्र आणि नवभारत आयोजित महाराष्ट्र सन्मान सोहळा निमित्ताने अनिकेत प्रकाश गायकवाड यांना तर्फे आदर्श उद्योजक पुरस्काराने सन्मानित Don't be a job seeker..be a job givers ! या ब्रीद वाक्याने मराठी तरुण पिढीला मोलाचा संदेश!

महाराष्ट्र उद्योजक डिजिटल डायरी

7/13/20261 min read

अनिकेत प्रकाश गायकवाड यांना तर्फे आदर्श उद्योजक पुरस्काराने सन्मानित
🏆 महाराष्ट्र सन्मान सोहळा – आदर्श उद्योजक पुरस्कार 🏆

नवराष्ट्र आणि नवभारत आयोजित "महाराष्ट्र सन्मान सोहळा" मध्ये मा. अनिकेत प्रकाश गायकवाड यांना "आदर्श उद्योजक पुरस्कार" प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून, प्रत्येक त्या मराठी तरुणाचा आहे जो मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस करतो आणि स्वतःच्या कर्तृत्वाने उद्योगविश्वात आपली ओळख निर्माण करण्यासाठी झटतो.

Phoenix Engineering Works च्या माध्यमातून संशोधन, उत्पादन विकास, यांत्रिक अभियांत्रिकी, विशेष यंत्रनिर्मिती (SPM), फॅब्रिकेशन आणि रोजगार निर्मिती या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत असलेल्या अनिकेत गायकवाड यांनी आपल्या कार्यातून अनेक तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

💬 त्यांचे प्रेरणादायी ब्रीदवाक्य...
"Don't be a Job Seeker... Be a Job Giver!"

"नोकरी शोधणारे नाही, तर नोकऱ्या देणारे बना!"

आजच्या मराठी तरुण पिढीने उद्योग, संशोधन, नवकल्पना आणि उद्योजकतेकडे वळावे, रोजगार निर्माण करावा आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात योगदान द्यावे, हा मोलाचा संदेश अनिकेत गायकवाड यांनी आपल्या कार्यातून दिला आहे.

हा पुरस्कार भविष्यात आणखी जोमाने समाजासाठी, उद्योगासाठी आणि तरुण उद्योजकांसाठी कार्य करण्याची नवी प्रेरणा आहे.

🙏 या सन्मानासाठी आयोजकांचे, मान्यवरांचे, ग्राहकांचे, सहकाऱ्यांचे, मित्रपरिवाराचे आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार! जय महाराष्ट्र! 🚩

MH-Udyojak.online
powered by Shalom Arts & Webs Solutions

Creative agency enhancing brands through digital services.

Concept and Creation By Vaishali Naikare

SAY "YES" TO YOUR BUSINESS GROWTH

© 2025 Shalom Arts & Webs Solutions. All rights reserved.

SUBSCRIBE NOW